Monday, June 17, 2024
Google search engine
Homeचंद्रपूरशासनाने काम बंद आंदोलनाची दखल घ्यावी- ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची मागणी

शासनाने काम बंद आंदोलनाची दखल घ्यावी- ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची मागणी

चंद्रपूर – गेल्या दोन दिवसापासून राज्यांमध्ये सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी रोजगार सेवक आदींचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ कोरपना येथे काम बंद आंदोलन सुरु आहे. यावेळी सरपंच ग्रामसेवक कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागणी करण्यात आल्या. सरपंचांना 15 हजार रुपये मानधन द्यावे ग्रामसेवकांची जुनी पेन्शन योजना Old Pension Scheme सुरू करावी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचाऱ्याप्रमाणे नियुक्त करावे रोजगार सेवकांना कायम तत्त्वावर नियुक्त करावे. Employment servants should be appointed on permanent basis आधी मागणी यावेळी करण्यात आल्या.

यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप तालुका अध्यक्ष अरुण काळे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश चिंचोलकर, उपादयक्ष अजय सिडाम, कोषाध्यक्ष गंगाराम जुमणाके, ग्रामसेवक युनियन अध्यक्ष रमाकांत गुरूनुले,उपाध्यक्ष सारिका धात्रक, सचिव विलास चव्हाण, विजय डांगे, महेश जगताप, लक्ष्मण मिसाळ, श्रीहरीत केंद्रे, संजय आडे, सतीश मडावी, प्रवीण ठाकरे,आवारपूर सरपंच प्रियंका दिवे, बाखर्डीचे सरपंच अरूण रागीट, हिरापूरचे सरपंच सुनीता तूमराम, सांगोडाचे सरपंच संजना सचिन बोंडे, कातलाबोडी सरपंच विजय धानोरकर, यांचे सह

सोनुरली सरपंच वासुदेव सिडाम बेलगाव चे सरपंच विनोद जुमनाके वडगावचे उपसरपंच सुदर्शन ढवडे माथा मंजुषा विलास देव्हाडकर कोडशी सरपंच उमेश कोल्हे सावल्हिरा उमेश पेंदोर, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश चिंचोलकर अजय श्रीराम गंगाराम जुमनाके विठ्ठल जुनगरी, रवी पंधरे, श्रीधर मडावी स्वप्नील पाचभाई, आधी उपस्थित होते सरकारने या कामांमध्ये आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सरपंच ग्रामसेवक तथा कर्मचारी संघटनेने दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page