Monday, June 17, 2024
Google search engine
Homeचंद्रपूरदेवाडा खुर्द येथील मृतक नितेशच्या परिवारा ला आर्थिक मदत

देवाडा खुर्द येथील मृतक नितेशच्या परिवारा ला आर्थिक मदत

चंद्रपूर – पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला.आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.

नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता.तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता.रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि त्याचा जीव गेला.घरची आर्थिक स्थिती बेताची.

नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आर्थिक कोंडी सुरू झाली.

अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले  (rajesh bele) यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.

यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page