Monday, June 17, 2024
Google search engine
Homeचंद्रपूरलक्ष ग्रुपच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन

लक्ष ग्रुपच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन

Chandrapur news

बल्लारपूर – (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन आणि महत्व कळावे याकरिता बल्लारपूर येथील लक्ष बहुउद्देशीय संस्थेतर्फे जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन दिनांक सात जानेवारीला बल्लारपूर येथील मोहसीन भाई जवेरी कन्या विद्यालय आणि जनता सिटी ब्रांच शाळा बल्लारपूर येथे घेण्यात आले.

लक्ष बहुउद्देशीय संस्थेद्वारा सतत दहा वर्षापासून ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे़. यात बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर येथील विद्यार्थी अतिशय उत्साहाने भाग घेतात. सात जानेवारीला घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जवळपास 2200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

ही परीक्षा दोन गटात घेण्यात आली.यात पहिल्या विभागात वर्ग पाचवी ते वर्ग दहावी तर दुसऱ्या विभागात वर्ग अकरावी ते वयोगट 30 पर्यंत विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी 70 शिक्षकांनी निशुल्क योगदान केले सोबतच लक्ष ग्रुपच्या 65 कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

लक्ष ग्रुपच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा निकाल दिनांक 12 जानेवारीला घोषित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेसाठी उत्साह वाढवण्यासाठी आकर्षक पारितोषिकही देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे संचालन सलमान खान यांनी केले तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लक्ष ग्रुपचे सदस्य शिक्षकगण यांनी मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page