Monday, June 17, 2024
Google search engine
Homeचंद्रपूरजोगापूर-राजुरा वन पर्यटनाला सुरुवात : वन्यप्रेमी पर्यटकांना जंगल सफारीचा घेता येणार लाभ.

जोगापूर-राजुरा वन पर्यटनाला सुरुवात : वन्यप्रेमी पर्यटकांना जंगल सफारीचा घेता येणार लाभ.

राजुरा (ता.प्र) :–चंद्रपूर वनवृत्त मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर वनपरिक्षेत्र राजुरा येथील अतिशय घनदाट निसर्गरम्य आणि समृद्ध वनसंपदेने नटलेल्या जोगापूर-राजुरा वन पर्यटन सफारी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन नुकतेच संपन्न झाले. यावेळी उपवनसंरक्षक मध्यचांदा श्वेता बोड्डू (भा. व.से.) यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपविभागीय वन अधिकारी राजुरा पवनकुमार जोंग, वन परिक्षेत्र अधिकारी राजुरा एस.डी.येलकेवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, तडस, चितळ, नीलगाय, रानगवे, भेडकी, रानकुत्रे, सांबर, मोर लांडोर, राणकोंबळा, विविध प्रजातीचे पशु पक्ष्याचे वास्तव्य, पिवळा पाणी तलाव, लाल पाणी तलाव, खिरणी तलाव, वाघ तलाव, दगडी तलाव, जोगापूर तलाव, इमली गुफा, टेहळणी करणारे मनोरे अशा विविध लक्षवेधी आणि मनमोहक ठिकाणं असलेल्या जोगापूर वन पर्यटनाला सुरुवात झाल्याने वन्यप्रेमी पर्यटक, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, एक मोकळा श्वास ,कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र चनाखा चे संचालक नितीन मुसळे यांचे वन विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी क्षेत्र सहाय्यक पी.आर. मत्ते , राजुरा , क्षेत्र सहाय्यक संतोष संगमवार टेंबुरवाही ,क्षेत्र सहाय्यक निबुध्दे वीहीरगाव, वनपाल मत्ते , तेंदु वनरक्षक सुनील गझलवार, मारोती चापले, संदीप तोडासे, पवन मंदुलवार, पवन देशमुख, भोजराज दांडेकर, संजय सुरवसे, अर्जुन पोले, सायस हाके, अंकिता नेवारे, वर्षा वाघ, सुलभा उरकुडे , वनमजूर सीताराम सातघरे व सर्व रोजंदारी मजूर तसेच पर्यटक मार्गदर्शक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वन्यप्रेमी पर्यटकांनी या जंगल सफारीचा लाभ मोठ्यासंख्येने घ्यावा असे आवाहन मध्य चांदा वन विभागाच्या वनपरिक्षेत्र राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. डी. येलकेवाड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page